Three Bhandara mayoral candidates—Congress, BJP, and Shinde Sena—offering prayers together at Shri Bahirangeshwar Temple. Saam Tv
Video

नगराध्यक्षपदाच्या तीन महिला उमेदवारांनी एकाचवेळी देवाला घातलं साकडं... आता देव कोणाला पावणार ? VIDEO

Devotion Meets Politics: भंडारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि शिंदेसेनेच्या महिला उमेदवारांनी एकत्रचं श्री बहिरंगेश्वर मंदिरात देवाला साकडं घालताना उत्सुकतेची परिस्थिती निर्माण केली आहे.

Omkar Sonawane

सध्या भंडाऱ्यात नगरपालिका निवडणुकीचं राजकारण तापलं आहे. विविध पक्षांचे उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीकास्त्र सोडून आपली बाजू मांडताना दिसत आहे. मात्र, भंडाऱ्यात श्री बहिरंगेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या देवदिवाळीच्या कार्यक्रमात भंडारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या काँग्रेस उमेदवार जयश्री बोरकर, भाजप उमेदवार मधुरा मदनकर आणि शिंदेसेनेच्या डॉ अश्विनी भोंडेकर या तिन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार एकत्रचं देवाला साकडं घालताना बघायला मिळाल्यात. या तिघीही निवडणुकीत विजयी करण्यासाठी देवाकडे एकत्रचं साकडं घालताना बघायला मिळालं असून आता भंडाऱ्याचे आराध्य दैवत असलेले श्री बहिरंगेश्वर महाराज आता कोणाचं साकडं ऐकते आणि कोणाला विजयी करते ही उत्सुकता भंडाराकरांना लागली आहे. राजकारणात कोणी कोणाचा मित्र नाही आणि शत्रूही नसतो, हे अनेकदा बघायला मिळालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

SCROLL FOR NEXT