MLA Mahesh Shinde  Saam Tv
Video

Maharashtra Politics : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांना भरला दम; शिंदे गटाच्या आमदाराचा VIDEO व्हायरल

MLA Mahesh Shinde Warning On Ladki Bahin Yojana : शिंदे गटाच्या आमदाराचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये आमदार शिंदे लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांना दम भरताना दिसत आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमधील शिंदे यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेविषयी चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना चांगलाच दम भरलाय. कोरेगाव भागात व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एका व्यक्तीनं आम्हाला नको तुमचे पंधराशे रुपये, आम्हाला मराठा आरक्षण द्या असा मेसेज केला होता.

त्यानंतर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी त्या व्यक्तीला फोन केला. तुला ही योजना नको असेल, तर तुझं नाव यातून डिलीट करतो असं सुनावले. यावेळी शिंदे यांनी मी कोरेगावचा आमदार आहे. कोणत्याही गावातील कानाकोपऱ्यातील लोकांना ओळखतो. डिसेंबरमध्ये स्क्रुटिणी कमिटीची बैठक होणार आहे. यात कोण पात्र, कोण अपात्र हे ठरणार आहे. यामुळं या निवडणुतीत कोण पुढं पुढं करतोय, याची यादी काढा. मग त्यांचा करेक्ट कार्यक्रम करूया, असं विधान केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिंदे यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT