राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुण्यातील एका मोठ्या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. गोखलेनगर येथील सरकारी मालकीची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा आणि त्यावर टीडीआर मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. 'शासकीय मालमत्ता मिळकतीचे बनावट कागदपत्राच्या आधारे शासनाची फसवणूक करून मिळविण्याबाबतचं माझं पत्र आहे', असे खडसे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, २०१४ मध्ये विरोधी पक्षनेते असताना माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांनी त्यांच्याकडे ही माहिती आणली होती. यानंतर त्यांनी १५ जून २०१४ रोजी पुणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहून कृषी विद्यापीठाच्या मालकीच्या या जमिनीवर टीडीआर मंजूर करू नये, अशी सूचना केली आणि संभाव्य घोटाळा थांबवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.