Shinde and Thackeray factions seen moving closer in Sindhudurg ahead of local polls — possible joint front against BJP. Saam Tv
Video

Maharashtra Politics: नगरपंचायत निवडणुकीत नवे समीकरण; शिंदे-ठाकरे सेना एकत्र येणार? VIDEO

Shinde And Thackeray Factions Alliance: कोकणातील सिंधुदुर्गात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर, शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Omkar Sonawane

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने आपली ताकद वाढवायला सुरू केली आहे. कणकवली नगरपंचायतीमध्ये भाजपचे इच्छुक उमेदवार समीर नलावडे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे सेना हे एकत्र येताना दिसत आहेत. यासाठी कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली असल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये नगराध्यक्ष म्हणून ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांचे नाव पुढे येत असून त्याला शिंदे शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे देखील समजत आहे. तसे झाल्यास राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Krantijyoti Vidyalay Collection : 'क्रांतीज्योती विद्यालय...' बॉक्स ऑफिसवर सुसाट, अमेय वाघच्या चित्रपटानं आठवड्याभरात कमावले तब्बल 'इतके' कोटी

BP चा त्रास होईल कमी; आत्ताच 'या' ४ सवयी करा फॉलो, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंगला झाला 'हा' गंभीर आजार; मुलाने भावूक होऊन केला खुलासा

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

SCROLL FOR NEXT