Uddhav Thackeray vs Eknath Shinde saam tv
Video

Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर' यशस्वी की अयशस्वी? उद्या ठाकरेसेना घेणार मोठा निर्णय

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला मोठा धक्का दिला. ठाकरेंचे ६ खासदार फोडले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

Priya More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या ९ खासदारांपैकी ६ खासदारांना फोडल्याची चर्चा सुरू आहे. हे सर्व खासदार शिंदेंसोबत जाणार असून त्यांना दिल्लीतून दुसऱ्या राज्यात हलवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. आता उद्याच्या ठाकरेसेनेच्या बैठकीत किती खासदार आणि कोणते खासदार येतात यानंतरच ठाकरेसेना पुढील भूमिका मांडणार आहे. शिंदेसेनेसोबत ६ खासदार नसल्याचा ठाकरेसेनेला विश्वास असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत नेमके कोणते खासदार येतात त्यावर ऑपरेशन टायगर यशस्वी की अयशस्वी हे ठरणार आहे.

पण ठाकरेंच्या ९ खासदारांपैकी अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे दोन खासदार हे पक्षासोबतच कायम राहणार आहेत. त्यानंतर ज्या ६ खासदारांची शिंदेंसोबत जाण्याची चर्चा सुरू होती त्यापैकी दोन खासदारांनी ठाकरेंसोबत राहणार असल्याचे सांगितले. खासदार राजाभाऊ वाजे आणि संजय दिना पाटील यांनी आपण कोणत्याही पक्षात जाण नसल्याचे माध्यमांसोबत सांगितल्यामुळे शिंदेंचे ऑपरेशन टायगर यशस्वी होतेय की नाही हे पाहणं महत्वाचे राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT