BJP MP Narayan Rane addressing media in Sindhudurg, warning CM Eknath Shinde over alliance talks with Thackeray Sena. Saam Tv
Video

... तर एकनाथ शिंदेंशी संबंध तोडून टाकू; भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा|VIDEO

Rajan Teli And Vishal Parab Controversy: भाजपचे खासदार नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट इशारा दिला आहे. ठाकरे गटासोबत शिंदे गटाची युती झाली तर राणे यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात संबंध तोडण्याचा इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे या दोघांची शिवसेना एकत्र येण्याची चर्चा काल(शुक्रवारी) दिवसभर सुरू होती. शहर विकास आघाडी या नावाने दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू असतानाच आता यावर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांना गंभीर इशारा दिला आहे. ही युती होण्यासाठी कणकवली शहरात गुप्त बैठक देखील झाली होती. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, तसेच सुशांत नाईक, संदेश पारकर आणि सतीश सावंत हे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. याची माहिती समजताच आता नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले. राणे म्हणाले, असे झाले तर एकनाथ शिंदे शिवसेनेचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही संबंध तोडून टाकू, विशाल परब आणि राजन तेल यांना मी मानत नाही. मी त्यांना नेहमी विरोध करीन. प्रतिष्ठित नागरिकांमध्ये राजन तेली बसत नाही. सर्वांनी टाकून दिलेले एकनाथ शिंदे का जमा करतोय? असा निशाणा राणे यांनी राजन तेली यांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाकडून संजय राऊत बरे होण्यासाठी महाआरतीचं आयोजन

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT