मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. या निवडणुकीसाठी इतर पक्षांप्रमाणेच मनसेने देखील कंबर कसली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजपासून महाराष्ट्र दौरा सुर होत आहे. राज ठाकरे पुण्याहून सोलापूरकडे जाणार आहे. त्यांचा हा दौरा १३ ऑगस्टपर्यंत आहे. राज ठाकरेंचा हा दौरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. राज ठाकरेंनी विधानसभा स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं होतं.
राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या आहेत. सोलापूरमध्ये आज ४ ऑगस्ट रोजी राज ठाकरे असतील, तर धाराशिवमध्ये ५ आणि लातूर ६ ऑगस्ट रोजी त्यांचा दौरा आहे. नांदेडमध्ये ७ ऑगस्ट, परभणी ८ ऑगस्ट, हिंगोली ९ ऑगस्ट, बीड १० ऑगस्ट, जालना ११ आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये १२ आणि १३ ऑगस्ट असा दोन दिवस राज ठाकरेंचा दौरा आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचं मिशन महाराष्ट्र सुरू होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.