विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी आज अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दोघांमध्ये अंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या घरी २० मिनिटं चर्चा झाली. या चर्चेचं नेमकं कारण अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अचानक उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान यापूर्वी देखील दोघांमध्ये चर्चा झाली होती. उदय सामंत यांनी १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री अचानक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत येऊन भेट घेतली होती
उदय सामंत यांच्या भेटीवरती मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. सामाजिक आणि राजकीय विषयावरती दोघांमध्ये चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान फडणवीस यांनी आरक्षण न दिल्यामुळे ३० तारखेच्या तुमच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.