Maharashtra Politics  Saam Tv
Video

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महायुतीत जागावाटपाचा घोळ कायम; अजित पवार गटाला किती जागा मिळणार? VIDEO

Mahayuti Seat Sharing cricis for Vidhan sabha election : लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीत जागावाटपाचा घोळ सुरू आहे. यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता असल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून आता धुमशान रंगताना दिसत आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा पेच काही सुटताना दिसत नाहीये, तर मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्यावरून देखील चांगलीच जुंपली होती. परंतु आता महायुतीतील जागावाटप रखडल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थता दिसून येतेय.

लोकसभेप्रमाणे जागावाटपाचा घोळ घातला तर फटका महायुतीला बसेल, असा पक्षातील काही नेत्यांनी सूर घेतलाय. तर अनेक आमदार आणि इच्छूक शरद पवारांच्या गळाला लागतील, असं एका वरिष्ठ नेत्याचं म्हणणं आहे. जागावाटपासंदर्भात अद्याप तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याची माहिती समोर येत आहे. पक्षातील नेत्यांनी अजित पवार यांच्यावर जागांसाठी दबाव टाकल्याची देखील माहिती मिळतेय. त्यामुळे आता महायुतीतील जागावाटपाचा घोळ केव्हा सुटणार? अजित पवार गटाला किती जागा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात नायलॉन मांजाविरोधात पोलिसांची मोठी कारवाई

Girls height growth: मुलींची उंची नेमकी कितव्या वर्षी वाढणं थांबतं? जाणून घ्या योग्य वय

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT