Mahavikas Aghadi Dispute india today
Video

Maharashtra Politics: महाविकास आघाडी फुटली; संजय राऊतांच्या भूमिकेवर काँग्रेसची नाराजी

Mahavikas Aghadi Dispute: ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडीतील फूट पडल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीत फूट कशामुळे पडली हे जाणून घेऊ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील धुसफूस टोकाला गेलीय. तर ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडीतील फूट स्पष्ट झालीय... याच महाविकास आघाडीच्या फुटीवरचा हा स्पेशल रिपोर्ट. विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीत कुरघोडीचं राजकारण रंगलंय.

त्यातच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाने थेट स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचं स्पष्ट झालंय. राऊतांचा दावा काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागलाय.. राऊतांनी माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलावं, असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी राऊतांना कानपिचक्या दिल्यात.

दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी राऊतांच्या भूमिकेला दुजोरा देत कार्यकर्त्यांसाठी स्वबळाचा नारा दिलाय. इंडिया आघाडी ही फक्त लोकसभा निवडणूकीसाठी होती, असं वक्तव्य दिल्लीत काँग्रेस नेत्याने केल्यानंतर त्याचे पडसाद देशभर उमटले..त्यानंतर ठाकरे गटाने इंडिया आघाडी वाचवण्यासाठी काँग्रेसला निर्वाणीचा इशाराही दिला होता.

आता राज्यात ठाकरे गट आणि त्यापाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्याचं स्पष्ट केलंय.. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचं दिसत असलं तरी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून पुन्हा एकतेची वज्रमूठ आवळणार की स्वतंत्रपणे खिंड लढवणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT