पडळकरांची आमच्या नजरेत नजर घालून पहायची हिम्मत नाही. आमशादादा आणि मी उभा असलो तर तो कोसो मैलाने दूर जातो. काहींना आदिवासींमध्ये येण्याचे डोहाळे लागलेत, मात्र आमच्यात कुणी येऊ शकत नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर आदिवासींच्या वाटेला गेला तर त्याला विधानसभेच्या सभागृहात देखील सोडणार नाही असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आदिवासी आमदार किरण लहामटे यांनी दिलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर येथे आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमात आमदार लहामटे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधलाय.
आदिवासी समाजाचे दैवत असलेल्या आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांची जयंती अकोले तालुक्यातील राजूर गावात मोठ्या उत्साहात पार पडलीय. राजूर गावात निघालेल्या मिरवणुकीत आदिवासी बांधवांनी आमदार किरण लहामटे यांना खांद्यावर उचलून घेत पारंपरिक नृत्यावर ठेका धरला. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आमदार किरण लहामटे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह धनगर आणि बंजारा नेत्यांवर निशाणा साधलाय.
1978 सालापासून धनगर समाज आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतोय. 2022 मध्ये हायकोर्टाचा निकाल आपल्याबाजूने लागल्याने धनगरांचा आदिवासींमध्ये येण्याचा प्रश्न मिटलाय. निवडणुका जवळ आल्याने काहींना आदिवासींमध्ये येण्याचे डोहाळे लागलेत. मात्र आमच्या मागे बाबासाहेबांची घटना आहे. एस.सी आणि एस.टी ला संविधानिक आरक्षण असून यांच्यात कुणी येऊ शकत नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर आदिवासींच्या वाटेला गेला तर गोपीचंद पडळकरला विधानसभेच्या सभागृहात देखील सोडणार नाही असा इशारा आमदार किरण लहामटे यांनी दिलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.