Uddhav Thackeray Press conference saam tv
Video

Uddhav Thackeray : नको तिथे मुख्यमंत्रिपदाचे कोंब फुटलेत ते छळतात...; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यावरून सल्ला दिला आहे.

Nandkumar Joshi

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतरही राजकीय वर्तुळात टीकेचा सूर घुमत आहे. राज्यातील शेतकरी प्रश्न, नागपुरातील दंगल आदी घटनांवरून, तसेच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत. नागपुरात दंगल झाली. बरीच वर्षे शांत असलेल्या नागपुरात दंगल घडली. आम्हाला संशय येतोय की मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ज्यांच्या मनात अजूनही मुख्यमंत्रिपदाचे कोंब नको तिथे फुटलेले आहेत, ते कोंब जात नाहीत. ते छळतात की काय असा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनाही प्रश्न पडला असेल की हे असे का वागतात.'

ठाकरे म्हणाले की, 'जयंत पाटलांनी सांगितलं की अधिवेशनाचं फलित काय? तर मला असं वाटतं की या अधिवेशन काळानं संपूर्ण देशाला, राज्याला एक चांगलं गाणं दिलं. ते देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. ते गाणं सगळ्यांना माहीत आहे. जयंत पाटील म्हणाले की हे अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत, बाकी काही नाही. अधिवेशनातून काय मिळालं, काय दिलं हे सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे.'

खिशात नाही आना आणि मला बाजीराव म्हणा, अशी गत या सरकारची झाली आहे. सरकारबद्दल कुणी काही बोललं की त्याला दडपून टाकायचं, असं सरकारचं धोरण आहे, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT