Mahayuti  saamtv
Video

Maharashtra Politics: 'सत्तेतला मोठा पक्ष मित्रांची शिकार करणार', राष्ट्रवादीच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Rohit Pawar Claims Ruling Party: 'सत्तेतला मोठा पक्ष मित्रांची शिकार करणार', राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी हा मोठा दावा केला आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Priya More

आमदार रोहित पवार यांनी राज्यातील राजकारणाबाबत खळबळजनक दावा केला आहे. सत्तेतील सर्वात मोठा पक्ष आपल्याच मित्रपक्षांची शिकार करणार असून ही प्रक्रिया पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असं त्यांनी म्हटलंय. सध्या गाजत असलेले 'भोंदू प्रकरण' हे सहज नसून ते जाणीवपूर्वक बाहेर काढल्याचा आरोपही त्यांनी केला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चेला उधाण आले आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भलीमोठी पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, 'भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे. आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत “जा बेवफा जा हमे…” याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Tea Benefits: महिनाभर रोज एक कप कोरा चहा प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

Black spots on onion: कांद्यावरील काळे डाग ठरू शकतात धोक्याची घंटा; खाण्यापूर्वी या गोष्टी तपासा

Maharashtra News Live Update: बी.कॉम.च्या कथित बनावट पदवी प्रकरणाविरोधात NSUI च्या आंदोलन

Banking News : बँकांनी ग्राहकांच्या खिशातून उकळले ₹२६,१७० कोटी, तुमच्याही खात्यातून बँक पैसे कट करत नाहीये ना?

सर्वात मोठी बातमी! परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, आता राज्यसभेत 'परीक्षा'

SCROLL FOR NEXT