Sharad pawar news Saam tv
Video

ठाकरे-पवारांना एकही नगरपालिका मिळता कामा नये - गिरीश महाजन

मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये मोठं विधान केलं आहे. ठाकरे आणि पवार गटाला एकही नगरपालिका मिळू देऊ नका, असं आवाहन त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार्श्वभूमीवर महाजन यांच्या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Girish Mahajan statement on Thackeray and Pawar before Jalgaon municipal elections जास्त त्रास देणाऱ्यांना आपल्या पक्षात घ्या म्हणजे आपला त्रास कमी होईल.. असं मोठं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय.. तर विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करू नका, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. महाजन यांच्या सल्ल्याची चर्चा जळगावमध्ये सुरू झाली आहे. आगामी काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रंगणार आहेत. त्याची तयारी महायुतीने सुरू केली आहे. त्याआधी महाजन यांनी ठाकरे अन् पवार यांना जळगावमधील एकही महानगरपालिका मिळू देऊ नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना केलेय.

जळगाव जिल्ह्यामध्ये सर्व नगरपालिका आपल्याला ताब्यात घ्यायच्या आहेत. आपण महायुतीमध्ये लढणार आहोत. त्यामुळे काही ठिकाणी अडचण आली तर स्वबळावर लढणार आहोत. शरद पवार गटाला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकही नगरपालिका मिळता कामा नये, असे विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पाऊस; वसमतमध्ये अनेक गावात शिरले पुराचे पाणी, बेरोळा गावकऱ्यांचा संपर्क तुटला

पुण्यात फक्त ₹७ लाखांत घर, म्हाडाची बंपर लॉटरी; हक्काच्या घरासाठी आजच अर्ज करा

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा महिला आघाडीचे आंदोलन, माझं कुंकू , माझा देश आंदोलन

Vasai Fort History: प्राचीन व्यापार केंद्र म्हणून ओळखला जाणारा वसई किल्ला, जाणून घ्या त्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

Colorful Snakes : भारतातले रंगीबेरंगी आणि विषारी साप कोणते?

SCROLL FOR NEXT