Raj Thackeray warns Maharashtra government saamtv
Video

Local Body Election : युती नकोच! राज ठाकरेंना काँग्रेसचा जोरदार धक्का, उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?

Congress refuses to ally with MNS in Maharashtra civic elections : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेसने मनसेसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. टिळक भवन येथील बैठकीत हा निर्णय घेऊन INDIA आघाडीसोबतच लढण्यावर भर देण्यात आला.

Namdeo Kumbhar

Congress Decides Against Alliance With MNS for Upcoming Local Body Elections : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने मनसे सोबत युती न करण्यावर ठाम भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत 'इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांसोबतच युती केली जाईल,' यावर सर्व नेत्यांचे एकमत झाले. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार की इंडिया आघाडीतील मित्रपक्षांना सोबत घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, पण मनसेसोबत युतीची शक्यता पूर्णपणे फेटाळण्यात आली आहे. हा निर्णय लवकरच दिल्लीतील पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवला जाणार असल्याचेही सांगण्यात आले. काँग्रेसने मनसेसोबत न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागेल आहे. ठाकरे काय निर्णय घेणार? उद्धव ठाकरे भावासोबत जाणार की काँग्रेससोबत? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT