Maharashtra Politics Saam Tv
Video

Maharashtra Politics: विधानपरिषदेत काँग्रेसच्या वरिष्ठांमध्ये दोन गट? राजकीय वर्तुळात चर्चा रंगली VIDEO

Congress Crisis After Jayant Patil Defeat: विधानपरिषदेत काँग्रेसच्या वरिष्ठांमध्येच दोन गट पडल्याची चर्चा सुरूय. विधानपरिषदेत जयंत पाटील पराभूत झालेत.

Rohini Gudaghe

मुंबई: विधानपरिषद निवडणुकीमध्ये जयंत पाटील पराभूत झालेत. यानंतर कॉंग्रेसची चार मतं फुटल्याचा आरोप देखील केला जातोय. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस कारवाई देखील करणार आहे. अशातच आता विधानपरिषदेत काँग्रेसच्या वरिष्ठांमध्येच दोन गट पडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यावरून ही चर्चा रंगल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विश्वासार्ह आमदारांची मतं वळविण्याचा ठाकरेंचा आग्रह असल्याची चर्चा देखील समोर येतेय. दरम्यान फुटीर आमदारांना ट्रकभरून पैसे दिल्याचा आरोप क्रॉस वोटिंगवरून संजय राऊतांनी केलाय. विधानपरिषदेत महायुतीच्या नऊ उमेदवारांचा विजय झालाय, तर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय झालेला आहे. कॉंग्रेसमधील काही आमदारांची मतं फुटल्याचा आरोप देखील केला जातोय, या अनुषंगाने कॉंग्रेस कारवाई करणार असल्याची माहिती मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोपरी पाचपाखाडीत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकत्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT