zishan siddique news  Saam tv
Video

झिशान सिद्दीकींची आमदारकी अडचणीत? काय आहे संपूर्ण प्रकरण?

zishan siddique news : झिशान सिद्दीकींची आमदारकी अडचणीत आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. वाचा नेमकं प्रकरण काय

Vishal Gangurde

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची विधान परिषदेसाठी झिशान सिद्दीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. झिशान यांच्या नावावर पक्षाच्या कोअर कमिटी आणि मुख्यमंत्री फडणवीसांसोबत प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. परंतु आता झिशान सिद्दीकी यांच्या आमदारकीवर टांगती तलवार निर्माण झाल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या एबी फॉर्मवरील सहीमुळे कायदेशीर वाद निर्माण झालाय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेले पत्र आणि एबी फॉर्मवरील माहिती जुळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वाद निर्माण झालाय. सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीने आयोगाला एक पत्र पाठवण्यात आलंय. त्यात तटकरेंच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यात सुनेत्रा पवारांच्या स्वाक्षरीने पत्रात पक्षाकडून करण्यात आलेला पत्रव्यवहार अंतिम सजण्यात यावे, असं नमूद करण्यात आलाय. तर दुसरीकडे झिशान सिद्दीकी यांनी ३० एप्रिल रोजी एबी फॉर्म जोडला. त्यात तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वाक्षरी आहे. त्यामुळे झिशान सिद्दीकींची आमदारकी अडचणीत आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : चांदीच्या आयातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Vicky Kaushal Birthday Photos : विकी -कतरिनाच्या मुलाला पाहिलं का? क्यूट फोटो आला समोर

Relationship advice: घरच्यांना गर्लफ्रेंडबद्दल सांगण्याची योग्य वेळ ओळखायची कशी? या गोष्टी नक्की जाणून घ्या

Summer Health Tips: कडाक्याच्या उन्हाळ्यातही फिट अन् फ्रेश राहायचं? फक्त या ५ गोष्टींकडे द्या लक्ष

Heatwave : उष्णतेचा कहर! देशात वर्धा सर्वात उष्ण जिल्हा; तापमान 46 अंश सेल्सिअसवर

SCROLL FOR NEXT