Nagpur fake teacher appointments 
Video

Teacher Scam : कोट्यावधीच्या शिक्षक घोटाळ्याचा पर्दाफाश! शिक्षक नियुक्तीसाठी 40 ते ४५ लाखांचा रेट

Nagpur fake teacher appointments : नागपूरसह महाराष्ट्रात ५०० कोटींचा शिक्षक भरती घोटाळा उघड. बोगस नेमणुका, वेतन बंद. निष्पाप शिक्षकांचे पगार अडकले.

Namdeo Kumbhar

Nagpur Teacher Scam : नागपूरमध्ये झालेल्या शिक्षक घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण राज्यात असल्याचं समोर येत आहे. ४०० ते ५०० कोटींचा हा सगळा घोटाळा आहे. आधीच्या तारखांची नियुक्ती दाखवत कोट्यवधी रूपये लाटले आहे. शिक्षक नियुक्तीसाठी ४० ते ४५ लाख रूपयांचा रेट होता, असे तपासातून समोर आलेय.

नागपूर जिल्ह्यातील सुमारे ५००० पेक्षा जास्त प्राथमिक शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन निघू शकले नाही. नागपूर जिल्ह्यात ५८० बोगस प्राथमिक शिक्षकांची भरती होऊन सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावल्याचे प्रकरण राज्यभर सध्या गाजत आहे. यामध्ये एप्रिल महिन्यात ९ एप्रिलला निलेश वाघमारे या नागपूरच्या प्राथमिक शाळांसाठीच्या वेतन अधीक्षकाला निलंबित करण्यात आले. त्यानंतर ज्या अधिकाऱ्याकडे प्रभार सोपवण्यात आला नसल्यानं पगार बिल निघाले नाही. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील सुमारे ५००० प्राथमिक शिक्षकांचे मार्च महिन्याचे पगार अद्याप होऊ शकले नसल्याची माहिती आहे. बोगस शिक्षक आणि त्यांच्यासाठी घोटाळा करणारे भ्रष्ट अधिकारी यामुळे निर्दोष प्राथमिक शिक्षकही मार्च महिन्याच्या वेतनापासून अद्यापही वंचित असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chronic Kidney Symptoms: क्रॉनिक किडनी डिजीजची सुरुवात कशी होते? महिलांनी अजिबात दुर्लक्षित करु नका

Maharashtra Live News Update: सतिश उर्फ खोक्याला जामीन मंजूर

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ; १५ गावांना सतर्कतेचा इशारा | VIDEO

Couple Romance News: धावत्या दुचाकीवर अश्लील चाळे, पुढे बसून बॉयफ्रेंडला मिठी मारली अन्...; कपलचा रोमान्स करतानाचा VIDEO चर्चेत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार? या दिवशी ₹१५०० जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT