narhari zirwal saam tv
Video

ACB raid : मोठी बातमी! नरहरी झिरवळ नॉटरिचेबल, मंत्रालयातील छापेमारीनंतर राज्यात खळबळ

ACB Maharashtra latest news : मंत्रालयातील एसीबी कारवाईनंतर मंत्री नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल असून त्यांच्या कार्यालयाशी संबंधित लाच प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

Narhari Zirwal corruption allegations update : मंत्रालयातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनं मोठी खळबळ उडालीय. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आज सकाळपासून 'नॉट रिचेबल' आहेत. अटक केलेल्या क्लर्ककडून झिरवाळांच्या खासगी पीएनं पैसे घेण्यास सांगितल्याचं चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती पुढे येतेय. त्यामुळे झिरवाळांच्या अडचणीत वाढ झालीय. या प्रकरणात संबंध आढळल्यास राजीनामा देईन असं त्यांनी म्हटलं होतं. पण आज सकाळपासूनच झिरवाळ नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ सकाळपासून नॉटरिचेबल आहेत. दोन दिवसांपूर्वी मंत्रालयातील त्यांच्या कार्यलयात एसीबीने छापा मारला होता. या छाप्यामध्ये संबंध आढळल्यास राजीनामा देईन असे ते म्हणाले होते. आता झिरवळांच्या खासगी पीएने पैसे घेण्यास सांगितल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यानंतर मंत्री नॉट रिचेबल आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT