Ajit Pawar And Raj Thackeray saam tv
Video

Maharashtra Politics : हिंदीवरून महाराष्ट्रात वाद; मनसेचा इशारा, अजित पवारांना टोला

Maharashtra Hindi language controversy : महाराष्ट्रातील शाळांतील अभ्यासक्रमात हिंदी भाषा विषय अनिवार्य केल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Nandkumar Joshi

शाळांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमात हिंदी भाषा विषयाच्या सक्तीला जोरदार विरोध होत आहे. यावरून मनसे देखील आक्रमक झाली आहे. राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, यावर अजित पवारांनीही प्रतिक्रिया दिली होती. सध्या कुणाला उद्योग नाही, मराठी आपली मातृभाषा आहेच, असं अजित पवार म्हणाले होते. आता अजित पवारांच्या या वक्तव्यावर मनसेने प्रत्युत्तर दिले आहे.

सध्या कुणाला उद्योग नाही. मराठी आपली मातृभाषा आहेच, त्याबद्दल कुणाचं दुमत नाही. प्रत्येक राज्याला आपल्या मातृभाषेबद्दल जिव्हाळा, आपुलकी, प्रेम आहे. ती टिकली पाहिजे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मोदी सरकारने तो मिळवून दिला. नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्यांना मराठी आलंच पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. त्यावर आता मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी उत्तर दिलं आहे. अजित पवारांना हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं जर वाटत असेल तर, त्यांना पुन्हा शाळेत पाठवलं पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटी

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

दोन लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल शानदार व्याजदर; 'या' बँकेने आणलीय धमाकेदार योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT