coronavirus  saam TV News
Video

Coronavirus : सिंगापूरनंतर राज्यात कोरोनाचा धोका वाढला? आरोग्यमंत्री म्हणाले...

Maharashtra Health Minister on Covid : महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, सध्याचा कोरोना पूर्वीइतका प्रभावी नाही. नवे व्हेरिएंट आढळत असले तरी घाबरण्याचे कारण नाही. राज्यात सतत मॅपिंग आणि उपाययोजना सुरु आहेत.

Namdeo Kumbhar

Maharashtra Health Minister Prakash Abitkar : कोरोनाच्या वाढत्या प्रभावावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आधीप्रमाणे कोरोना विषाणू प्रभावी राहिला नाही. आम् केंद्र सरकारकडून याबाबत माहिती घेत आहोत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवे व्हेरिएंट येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून ज्या काही सूचना येतील, त्याचे पालन केले जाईल, असे आरोग्यमंत्री म्हणाले आहेत.

सिंगापूर आणि हाँगकाँगबाबत केंद्र सरकार लक्ष ठेऊन आहेत. आता कोणतीही भीती, घाबरण्याची गरज नाही. डॉ दीपक सावंत यांनी पत्र लिहिले आहे, त्याचापण विचार करू. सोबत सर्वांच्या सूचना घेऊ आणि निराकरण करू, असे आरोग्यमंत्री म्हणाले.

कोरोना राज्यात वाढत आहे. याबाबत टीव्हीवर दिसत आहे. पण हा करोनो पूर्वीसारखा राहिला नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. १५ वर्षांपासून स्वाइन फ्लू होता, तो आताही आहे. तसेच कोरोनाचे आहे. तो आपल्यासोबत राहणार आहे. आपण काळजी घेतली पाहिजे. आरोग्य विभागाच्या वतीने सातत्याने तपासणी IDSP अँप मदतीने आम्ही मॅपिंग करत आहोत. सर्व आजारावर उपचार करण्यासाठी यंत्रणा तयार ठेवली आहे, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : तपासाच्या नावाखाली पर्यटन! पुण्यातील महिला पोलिस अधिकाऱ्यासह तिघांवर कारवाई, दोन वर्षांची वेतनवाढ थांबवली

Maharashtra News Live Update: भाजप नेते विजय चौधरी यांचा उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्री सायबर क्राइमची शिकार, काही मिनिटांत अकाउंटमधून लाखो लंपास

अभिनेता रणबीर कपूरपासून ते साई पल्लवीपर्यंत! 'रामायण'च्या स्टारकास्टमध्ये कोण कोण? पाहा फोटो

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, प्रति तोळा आज इतक्या रूपयांना मिळणार, वाचा मुंबई-पुण्यातील ताजा भाव

SCROLL FOR NEXT