Women beneficiaries awaiting e-KYC correction under Maharashtra’s Ladki Bahin Yojana. Saam Tv
Video

लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार|VIDEO

Ladki Bahin Yojana e-KYC Deadline Extension Maharashtra: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी. ई-केवायसीतील चुका दुरुस्त करण्यासाठी शासनाकडून पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक व मानवी चुका झाल्यामुळे हजारो महिलांना डिसेंबर महिन्याचे १५०० रुपये अद्याप मिळालेले नाहीत. ही बाब लक्षात घेत शासनाकडून ई-केवायसीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

३१ डिसेंबर ही ई-केवायसीसाठी अंतिम मुदत होती. मात्र या प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांनी चुकून ‘शासकीय नोकरदार’ या पर्यायावर क्लिक केल्याने त्या अपात्र ठरल्या आणि त्यांचा लाभ तात्पुरता बंद झाला. प्रत्यक्षात या महिला शासकीय सेवेत नसतानाही केवळ एका चुकीच्या क्लिकमुळे त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.

या पार्श्वभूमीवर शासनाने महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन फेरपडताळणी करण्यात येणार आहे. या पडताळणीनंतर पात्र महिलांना ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची स्वतंत्र संधी दिली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT