vishal patil  Saam Tv
Video

Dhangar Reservation: धनगर आरक्षणाबाबत शासनाकडून प्रस्तावच नाही, खासदार विशाल पाटील यांचा धक्कादायक खुलासा

MP Vishal Patil's Shocking Revelation: सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र राज्य सरकारने याबाबत कुठलाही प्रस्तावच पाठवला नाही असा खुलासा त्यांनी केला.

Omkar Sonawane

धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील समावेशासाठी महाराष्ट्र शासनाकडून केंद्र शासनाकडे कुठलाही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही असा खुलासा सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. धनगर आरक्षण प्रकरणी काही लोक माझ्या नावाने ओरडत होते. मी घरी नसताना माझ्या घरासमोर ढोल वाजवले गेले. मी माझा शब्द पाळला. मी संसदेत आरक्षणाचा प्रश्न मांडला. त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केंद्र शासनाकडे पाठपुराव्यासाठी राज्याकडून तांत्रिक सहा कार्य मिळावं अशी मागणी केली. त्यामुळे आरक्षण प्रश्नावरून कुणीही राजकारण करू नये असेही ते म्हणाले. पुढे विशाल पाटील म्हणाले, मी धनगर आरक्षणासंदर्भात संसदेत प्रश्न मांडला आणि लेखी उत्तराची मागणी देखील केली त्यावर जनजाती मंत्रालयाकडून नुकतेच उत्तर मिळाले ते अतिशय धक्कादायक होते सन 1971 ला राज्य सरकारने धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत प्रस्ताव दिला होता मात्र पुन्हा 1981 ला धनगर समाज संबंधित निकष पूर्ण करत नसल्याबाबत अहवाल सादर केला त्यानंतर या मंत्रालयाकडे धनगर समाज आरक्षण बाबतचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natural Hair Care: केस खूप गळतायेत? मग घरच्या घरी बनवा नैसर्गिक हा हेयर मास्क, मिळवा चमकदार केस

Woolen Clothes: थंडीत लोकरीच्या कपड्यांना दुर्गंधी येतेय? फॉलो करा 'या' घरगुती टिप्स

आईच्या साडीनं मुलानं आयुष्याचा दोर कापला; सातवीतल्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल

Health Tips : सकाळी नाश्ता करणे गरजेचे आहे की नाही? संशोधनातून समोर आली नवीन माहिती

Rohit Sharma-Virat Kohli : 'रो-को'ला ब्रेक! रोहित शर्मा, विराट कोहलीचं कमबॅक लांबणीवर, मोठी अपडेट आली

SCROLL FOR NEXT