गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या राजकीय वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कोरम पूर्ण होत नसल्यामुळे सरकारने अध्यादेश काढल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, 10 तारखेलाही कोरम पूर्ण न झाल्यास अडचण निर्माण होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. गोकुळ दूध संघावर पुन्हा प्रशासक नियुक्त होऊ नये, यासाठी सरकारने अध्यादेश काढल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणात दोन्ही गटांनी एकत्र बसून चर्चा करावी आणि हा मुद्दा सोडवावा, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर नेण्याची काँग्रेसवर वेळ आल्याची टीका फडणवीस यांनी केली. राहुल गांधी यांना हा मुद्दा राजकीय बनवायचा असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा अध्यादेश मंत्रिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला असून, महाधिवक्त्यांचा सल्ला घेतल्यानंतरच शासन निर्णय काढण्यात आल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.