Maharashtra Farmer News SaamTv
Video

Farmers News : सरकार शेतकऱ्यांना देणार 50 हजार; बघा काय आहे योजना

Maharashtra News : राज्य सरकारने सुरू केलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आधार प्रमाणीकरण सुरू आहे.

Saam Tv

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी आधार प्रमाणीकरण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला 18 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा लाभ प्रशासनाकडून दिला जाणार आहे. मृत शेतकऱ्यांच्या वारसांनासुद्धा बँकेत वारसा नोंद केल्यास या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने 2019 मध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत हा लाभ आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. सरकारकडून 12 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान आधार प्रमाणिकरणासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र यात अद्याप 16 हजार शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण झालं नसल्यानं आता या मोहिमेला 18 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ सरकारकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

मोठी बातमी! NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन उघड; सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात

मोदींच्या आवाहनानंतर VIP संस्कृतीला चाप, बचतीसाठी सरकारी कार्यक्रमांना कात्री

Maharashtra News Live Update: इंधन बचतीसाठी अकोला पोलीस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम

SCROLL FOR NEXT