Ambadas Danve on nagpur violence Saam Tv
Video

Nagpur Violence: मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नागपूरचे, अंबादास दानवे नागपूर दंगलीवरून कडाडले,VIDEO

Ambadas Danve Slams Government Over Nagpur Riots: औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये दोन गटात राडा होऊन भयावह अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Omkar Sonawane

नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीबाबत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. या संपूर्ण घटनेची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे दोघेही नागपूरचे असताना, पोलिस प्रशासनाला परिस्थिती हाताळता येत नाही, ही गंभीर बाब आहे.

दानवे पुढे म्हणाले की, गेल्या महिन्याभरापासून राज्य सरकार हिंदू-मुस्लिम दंगल घडवून आणण्याचे षडयंत्र रचत आहे. जनतेचे सामान्य जीवन विस्कळीत करून, समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. हिंदू आणि मुस्लिम दोघांचेही जनजीवन उद्ध्वस्त करून, केवळ राजकीय पोळी भाजण्याचा सरकारचा हेतू स्पष्ट दिसत आहे.

दानवे म्हणाले, या दंगलीमागे भाजप आणि त्यांच्या अंगीकृत संघटना कार्यरत असून, संपूर्ण राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या परिस्थितीला संपूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असून, त्यांना या जबाबदारीतून मोकळं होता येणार नाही, असे म्हणत त्यांनी भाजपसह सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बीडच्या मयत ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबीयांना मिळाला न्याय

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

SCROLL FOR NEXT