महाराष्ट्राच्या आरोग्य विभागासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राज्यात एकाचवेळी 1,440 एमबीबीएस आणि स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांमधील डॉक्टरांची कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे. आणखी सुमारे 500 डॉक्टर लवकरच सेवेत दाखल होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं शिंदे यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात येत असून, राज्य आणि केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शिवसेनेकडून तालुकास्तरावर मदत कक्षही उभारण्यात येणार आहेत. विरोधकांच्या आंदोलनांवर आणि संविधानाच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.