Fish Price Hike SAAM TV
Video

Fish Price Hike : खवय्यांच्या ताटातून मासे गायब होणार, सुरमई -पापलेटसह इतर मासळीचे दर गगनाला | VIDEO

Surmai And Pomfret Prices : खवय्यांसाठी एक मोठी बातमी! तुमच्या ताटातील मासे महाग झाले आहेत. ‘सुरमईचा दर प्रति किलो आठशे ते बाराशे रुपये आणि पापलेट पंधराशेंपर्यंत पोहोचलं आहे.’

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

खवय्यांसाठी एक मोठी आणि चिंतेची बातमी आहे. कारण तुमच्या ताटातील मासे महाग झाले आहेत. ‘सुरमईचा दर प्रति किलो आठशे ते बाराशे रुपये आणि पापलेट पंधराशेंपर्यंत पोहोचलं आहे,’ अशी माहिती समोर आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश परिस्थितीमुळे गेल्या आठ दिवसांपासून मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली असल्याचं वृत्त आहे. याचा थेट परिणाम मासळी बाजारावर झाला असून कोळंबी, सरंगा आणि मुळोचा यांसारख्या इतर मासळीच्या दरातही पंचवीस ते चाळीस टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. या अनपेक्षित दरवाढीमुळे खवय्यांसह सामान्य नागरिकांचे आणि हॉटेल व्यावसायिकांचे बजेट कोलमडले आहेत. हवामान विभागाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला असून, परिस्थिती निवळल्यानंतरच मासळीचे दर नियंत्रणात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, पुण्याच्या तापमानात देखील होणार वाढ

E20 Petrol: इथेनॉलमुळे पेट्रोल टँकला मुंग्या? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? खासदारांसोबत ठाकरेंचे आमदारही फुटणार?

IAS Transferred: राज्यातील १२ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या,कोणाची कुठे झाली बदली?

आताची सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; ६ खासदार साथ सोडणार?

SCROLL FOR NEXT