शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार?  saam tv
Video

Maharashtra Farmer Loan : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार?;२ लाखांपर्यंत थकीत कर्ज माफ होणार

maharashtra farmer loan waiver 2 lakh karjamafi yojana : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच कर्जमाफी होण्याची शक्यता असून, २ लाखांपर्यंतचं कर्ज माफ होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Nandkumar Joshi

महायुती सरकारनं जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजने'चा मार्ग मोकळा झाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिलीय. तब्बल 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे. 2 लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यासोबतच, नियमित कर्जदारांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर 27 हजार कोटींचा भार पडणार आहे.

दरम्यान, कर्जमाफी समितीचा अहवाल सार्वत्रिक करण्याची मागणी किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी केली आहे. प्रवीण परदेशी समितीचा अहवाल चर्चेसाठी खुला करावा, असेही त्यांनी सांगितले. जुन्याच कर्जमाफी निकषांचा वापर करू नये. नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही समान लाभ द्यावा. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा द्यावा. याशिवाय मुदत वाढवून ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी लागू करावी, असेही नवले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईमध्ये रक्तरंजित थरार! भरदिवसा चौघांवर जीवघेणा हल्ला, चाकूने सपासप वार; एकाचा जागीच मृत्यू

शत्रूंपासून सावध राहा, किरकोळ खर्च टाळा; ५ राशींच्या लोकांना मोठ्या संकटाना सामोरे जावे लागणार

Beed Crime: तू माझ्याशी का नाही बोलत? चारित्र्याच्या संशयावरून तरुणीवर जीवघेणा हल्ला; घरात घुसून चाकूने सपासप वार, परळी हादरले

Varanasi : मांस विक्री व्यवसायावर मोठा बदल; टप्प्याटप्प्याने दुकाने शहराबाहेर हलवणार, कुठे आणि का?

Maharashtra News Live Update: राष्ट्र्वादीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवांरांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरू

SCROLL FOR NEXT