Mauli Balu Shinde drug trafficking allegations Parner. Saam TV Marathi
Video

महाराष्ट्र हादरला! ड्रग्ज प्रकरणात पवारांच्या खासदाराचा विश्वासू कार्यकर्ता, राजकीय वर्तुळात खळबळ

Mauli Balu Shinde drug trafficking allegations Parner: अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार! जप्त केलेले २ कोटींचे ड्रग्ज चोरून तिथे पीठ ठेवणाऱ्या पोलिसासह, खासदार निलेश लंके यांचा जवळचा कार्यकर्ता ज्ञानदेव शिंदेवर गुन्हा दाखल.

Namdeo Kumbhar

Ahilyanagar md drugs case police constable arrested : अहिल्यानगरमध्ये पोलिस दलाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारी श्यामसुंदर गुरव याला एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स चोरून विकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. श्रीरामपूर येथे जप्त केलेल्या दोन कोटी दहा लाख रुपयांच्या १ किलो ५२ ग्रॅम एमडी ड्रग्सऐवजी पोलिस कस्टडीत चक्क पीठ ठेवण्यात आल्याचं उघड झालं आहे. हा नशेचा साठा शिरूर येथे विक्रीसाठी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पारनेर येथील ज्ञानदेव उर्फ माऊली बाळू शिंदे याच्यावरही दोन कोटी रुपयांच्या ड्रग्स विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानदेव शिंदे हा खासदार निलेश लंके यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर निलेश लंके आणि त्यांच्या पत्नींसोबतचे फोटो व्हायरल होत असून, या प्रकरणात राजकीय वरदहस्त आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या आरोपांना आता पुष्टी मिळतेय का, याकडेही लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण; १३१ जण पद्म पुरस्काराने सन्मानित,वाचा संपूर्ण यादी

Appam Recipe : साउथ स्टाइल मऊ-जाळीदार अप्पम घरी कसं बनवाल? वाचा खास रेसिपी

shocking : सरपंच सासू अन् मुख्याध्यापक सासऱ्याचा जाच असह्य झाला; पुण्याच्या दीप्तीने मृत्यूला कवटाळलं

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये शिवसेनेच्या दोन गटात मोठा राडा

Quick Hairstyle on Saree: साडीवर झटपट करता येईल 'या' खास आणि ट्रेंडी हेअरस्टाईल्स

SCROLL FOR NEXT