maharashtra drought solapur saam tv ground report  Saam tv
Video

Maharashtra Drought : 'गावात नळ आहेत, पण पाणीच नाही...' दुष्काळामुळे सांगवीकरांची वणवण, पाहा ग्राऊंड रिपोर्ट

Maharashtra Solapur Drought News : महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट गडद होत असताना सोलापूरच्या सांगवी गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घराघरांत नळजोडण्या असूनही पाणी गायब आहे. या भीषण परिस्थितीची दखल साम टीव्हीने घेतली.

Alisha Khedekar

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनताना दिसत आहे. बदलत्या हवामानाचा आणि एल निनोच्या परिणामांचा शेतीसह ग्रामीण जनजीवनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक भागांमध्ये पावसाच्या अनिश्चिततेमुळे पाणी उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.गावात जाऊन याचा आढावा साम टीव्हीच्या टीमने घेतला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सांगवी गावातील परिस्थिती या संकटाची भीषणता दाखवून देणारी आहे. गावात घरोघरी नळजोडणी करण्यात आली आहे; मात्र नळाला पाणीच येत नसल्याने या सुविधेचा ग्रामस्थांना काहीच उपयोग होत नाही. परिणामी, पाण्याच्या शोधात गावकऱ्यांना दररोज लांबचा प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे, दिवसभर काम करून घरी परतल्यानंतरही पुरुष मंडळींना पाण्यासाठी पुन्हा घराबाहेर पडावे लागते. गावातील काही नागरिकांना जवळपास एक किलोमीटर अंतर पार करून पाणी आणावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घरच्या नळाला कधीतरी पाणी आलेच, तरी त्यातून जेमतेम दोन ते तीन घागरी पाणी मिळते. त्यामुळे पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि इतर दैनंदिन कामांसाठी पाणी पुरवायचे कसे, असा प्रश्न प्रत्येक कुटुंबासमोर उभा आहे.

पाण्याच्या या संघर्षामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुलांचेही मोठे हाल होत आहेत. गावात पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, आगामी काळात पाणीटंचाईवर वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत, तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. विशेषतः मे-जून २०२७ पर्यंत दुष्काळाचे संकट गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. १९७२ चा दुष्काळ पुन्हा होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने आतापासूनच ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे जिल्ह्यात खासदार क्रीडासंग्रामचा आजपासून थरार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! आज १० तोळा ४९०० रुपयांनी स्वस्त; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर

Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात मोठी पदोन्नती, २ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना महासंचालकपदी बढती

Temple Visit : देव दर्शनाला जाताय? मंदिरात 'या' ५ गोष्टी करणे टाळा; करिअरमध्ये होईल प्रगती, घरात वाढेल पैसापाणी

महिलांनी सकाळी उठल्यानंतर चुकूनही ही 5 कामे करू नये

SCROLL FOR NEXT