Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! आज १० तोळा ४९०० रुपयांनी स्वस्त; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर

Gold Silver Price Drop: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा मोठा बदल झाला आहे. सराफा बाजार उघडताच सोनं स्वस्त झालं तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत.
Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! आज १० तोळा ४९०० रुपयांनी स्वस्त; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Silver Price Dropmeta ai
Published On: 

सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाली. त्यामुळे आज ग्राहकांना सोनं-चांदी खरेदीची सुवर्णसंधी आहे. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. आज २४ कॅरेटचे १ तोळा सोनं ४९० रुपयांनी स्वस्त झालं. तर आज चांदीच्या दरात काहीच बदल झालेला नाही. सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर किती ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४९० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,२५,०८० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४,९०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १२,५०,८०० रुपये खर्च करावे लागतील.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! आज १० तोळा ४९०० रुपयांनी स्वस्त; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Rate Today : ग्राहकांसाठी खुशखबर! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; सुवर्णनगरीत १ तोळ्याची किंमत किती?

आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४५० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१४,६५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ४,५०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,४६,५०० रुपये खर्च करावे लागतील.

२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटचे सोनं देखील आज स्वस्त झालं आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ३७० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना ९३,८१० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,७०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना ९,३८,१०० रुपये खर्च करावे लागतील.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! आज १० तोळा ४९०० रुपयांनी स्वस्त; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Rate Today : आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, १ तोळा ५१२० रुपयांनी स्वस्त; वाचा १८-२२ आणि २४ कॅरेटचे दर

आज सोनं स्वस्त झालं असली तरी चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. आज १ ग्रॅम चांदीचा दर १७५ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा आजचा १,७५,००० रुपये इतका आहे. आज चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे चांदी खरेदी करणं देखील फायदेशीर राहणार आहे. लग्नसराई असल्यामुळे ग्रहाक सोनं-चांदी खरेदी करत आहेत. अशामध्ये सोनं-चांदीच्या दरातील घसरण असल्यामुळे त्यांच्या खिशावर जास्त ताण येत नाही.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! आज १० तोळा ४९०० रुपयांनी स्वस्त; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर
Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १० तोळा ७०,००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.