Maharashtra Weather SAAM TV
Video

Maharashtra Weather : राज्यात थंडीची लाट, जळगावात तापमान १२.६ अंशांवर; इतर ठिकाणी काय स्थिती? | पाहा VIDEO

Maharashtra cold wave : राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक शहरांमध्ये तापमानात घट झाली आहे. या बदलत्या हवामानाचा आरोग्यावर आणि पिकांवर होणाऱ्या परिणामाकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक शहरांमध्ये तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 'उत्तरेकडील थंड वारे आणखी सक्रिय झाल्यामुळे आगामी काळात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे'. शुक्रवारी अनेक ठिकाणी तापमानाचा पारा खाली आला. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवत असून, पुढील काही दिवसांत संपूर्ण राज्यात तापमान आणखी कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. या बदलत्या हवामानाचा आरोग्यावर आणि पिकांवर होणाऱ्या परिणामाकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यात थंडीचा कडाका कुठे? जाणून घ्या

जळगाव - 12.6 अंश

अमरावती - 13.1 अंश

महाबळेश्वर - 13.8 अंश

नाशिक - 14.2 अंश

पुणे - 17.3 अंश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या बंडखोराला घरात कोंडलं! माघारीची भीती, समर्थकांची रणनीती

Maharashtra Live News Update: नंदूरबारमध्ये मेंढपाळ आक्रमक

Saturday Horoscope: 4 राशींचं नशीब पालटणारा! काहींची संकट होणार दूर, वाचा शनिवारचे राशीभविष्य

मोदी-शाहांना हायकोर्टानं ठोठावली शिक्षा? पंतप्रधान मोदी-शाह जेलमध्ये जाणार?

Purnima Birth: पौर्णिमेला जन्मलेले मुलं कशी असतात?

SCROLL FOR NEXT