Beed Crime Marathi News  Saam TV Marathi
Video

CCTV Video : भावजय नगरसेवक कशी झाली? विजयी उमेदवाराच्या घराबाहेर कोयत्याने हल्ला, बीड पुन्हा हादरले

Beed municipal election violence CCTV video : बीड नगरपरिषद निवडणुकीनंतर विजयी उमेदवाराच्या घराबाहेर कोयत्याने दहशत माजवण्यात आली. “भावजय नगरसेवक कशी झाली?” असा जाब विचारत धमकी दिली.

Namdeo Kumbhar

Beed Crime Marathi News : बीडमध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर धक्कादायक प्रकार घडलाय. विजयी उमेदवाराच्या घराबाहेर कोयता फिरवत आरोपीनं दहशत माजवलीये. “तुझी भावजय नगरसेवकपदी निवडून कशी काय आली?” असा जाब विचारत आरोपीने कोयता फिरवला, दोन दुचाकींची तोडफोड केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातच्काळ आरोपीला अटक केली असून तपास करण्यात येत आहे.

बीडच्या नगरपरिषद निवडणुकीत संत नामदेवनगर येथील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आरती बनसोडे या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. निकालानंतर शेजारीच राहणाऱ्या कौशल्य मस्के याने आरती बनसोडे यांचे दीर अजिंक्य बनसोडे यांच्या घरासमोर धारदार कोयता घेऊन दहशत माजवली. भावजय नगरसेवक कशी झाली? असा जाब विचारत कोयत्याने दोन दुचाकींची तोडफोड केली. कोयता फिरवत मोठ-मोठ्याने ओरडत जीवे मारण्याची देखील धमकी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT