Yugendra Pawar SaamTv
Video

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Maharashtra Vidhan Sabha Election : आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार याच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली.

Saam Tv

निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. त्यासाठी सर्व पक्षांकडून आज सांगता सभा घेण्यात येत आहेत. बारामतीत देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांची सांगता सभा पार पडली. यावेळी स्वत: शरद पवारांची उपस्थिती होती. या सभेत बोलताना उगेनदर पवार म्हणाले की, लोकसभा निवडणूकची सांगता सभा याठिकाणी झाली होती तेव्हा वाटलं नव्हतं की काही महिन्यांनी तुम्ही माझ्यासाठी सांगता सभेला याल. २३ तारखेला तुतारी वाजणार आहे. पवार साहेब काय बोलणार, याकडे संपु्र्ण देशाचं लक्ष लागलं आहे. बारामती तालुक्यात पाण्याचा प्रश्न आहे. दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवणार. तसंच, पाण्याच्या प्रदुषणाचा प्रश्न सोडवणार, बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावणार. पवार साहेबांनी हींजवडीत आयटी पार्क आणलं, तसंच आयटी पार्क बारामतीमध्ये आणणार.

बारामतीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत विधानसभेच्या रिंगणात रंगणार आहे. युगेंद्र पवार यांच्या विरुद्ध अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे याठिकाणी चुरशीची लढत रंगणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

SCROLL FOR NEXT