Assembly Election  Saam Tv
Video

Assembly Election : महायुती अन् मविआचं घोडं कुठे अडलं, विधानसभेच्या जागावाटपात नेमका कशाचा अडसर? पाहा VIDEO

Seat Sharing Issue Of Mahayuti Mahavikas Aghadi : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीला पितृपक्षाचा अडसर येत असल्याचं दिसतंय. नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. परंतु अजून अधिकृतपणे महाविकास आघाडी आणि महायुतीने जागावाटपाची यादी जाहीर केलेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्याच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठका देखील सुरू झाल्यात. परंतु अंतिम फॉर्म्युला लगेच जाहीर होणार नसल्याचं समोर जातंय. पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्र उत्सवाच्या काळात त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

पितृपक्षाला आता १८ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. पितृपक्ष २ ऑक्टोबरपर्यंत असेल. पितृपक्षामध्ये कोणताही शुभ निर्णय करू नये, अशी धारणा असल्याचं मानलं जातंय. अनेकदा राजकीय पक्षांनी याचं पालन देखील केलंय. यापूर्वी देखील असं निदर्शनास आलंय. आमची चर्चा सुरू आहे. पितृपक्ष झाल्यानंतरच जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करू, असे दोन्ही बाजूंचे नेते सांगत असल्याचं दिसतंय. नवरात्रोत्सवात जागावाटपाची यादी जाहीर होईल, अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT