11th Admission saam tv
Video

11th admission deadline : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ, या तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

Maharashtra 11th admission deadline extended due to heavy rainfall : अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी माहिती आहे. प्रवेशासाठी आता मुदतवाढ दिली आहे.

Nandkumar Joshi

अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र, पावसामुळं प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यातील जवळपास सर्वच भागांत तुफान पाऊस आहे. काही ठिकाणी तर पूरस्थिती निर्माण झाली. सध्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पण पावसामुळं प्रवेश घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे. सर्वांसाठी खुल्या फेरीतून विद्यार्थ्यांना २२ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.

राज्यात ९ हजार ५२५ ज्युनियर कॉलेज आहेत. त्यातील २१,५०, १३० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे. आतापर्यंत १२,०३, ४१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या फेऱ्यांत प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी, पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी खुला या फेरी अंतर्गत विशेष फेरी घेण्यात येत आहे. त्याची मुदत १७ ऑगस्टपर्यंत होती. काही जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळं शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दिलेली २० ऑगस्टपर्यंतची मुदत २२ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT