Maha Kumbh Mela Saam Tv
Video

Maha Kumbh Mela: पीएम मोदी प्रयागराजच्या दौऱ्यावर, कुंभमेळ्यात सहभागी होत करणार गंगास्नान

PM Narendra Modi: पीएम मोदींचा गंगा स्नान कार्यक्रम सकाळी ११ ते ११.३० वाजेपर्यंत असणार आहे. याआधी पीएम मोदी १३ डिसेंबर २०२४ रोजी प्रयागराजच्या दौऱ्यावर आले होते.

Priya More

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराजच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान कुंभमेळ्यामध्ये सहभागी होत ते त्रिवेणी संगमावर स्नान करणार आहेत. यासाठी ते काही वेळापूर्वीच प्रयागराज एअरपोर्टवर दाखल झाले आणि प्रयागराजच्या दिशेने रवाना झाला. ते अरैल घाटवर दाखल झाले असून याठिकाणी ते जवळपास अर्धा तास स्नान पूजन करणार आहेत. पीएम मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित आहेत.

पीएम मोदींचा गंगा स्नान कार्यक्रम सकाळी ११ ते ११.३० वाजेपर्यंत असणार आहे. याआधी पीएम मोदी १३ डिसेंबर २०२४ रोजी प्रयागराजच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर त्यांनी ५,५०० कोटी रुपयांच्या १६७ विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. महाकुंभ सुरू झाल्यानंतर पीएम मोदींचा हा पहिलाच प्रयागराज दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एटीएस आणि एनएसजीसह इतर सुरक्षा पथकांनाही सतर्क करण्यात आले आहे. संगम परिसरात निमलष्करी दल देखील तैनात करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कल्याण-डोंबिवलीमधील ३ उमेदवारांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

घरातून बाहेर पडताना गोड पदार्थ खाऊन निघा; ५ राशींच्या लोकांना आयुष्यातील सर्वात मोठं यश मिळणार

Maharashtra Live News Update: भाजपने एमआयएमबरोबर युती केली, हिंदुत्वाचं काय? - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: 'कोण कुठे चाललंय? कोणाच्या सोंगट्या कोणाच्या...'; राज ठाकरेंचा नाशिकमध्ये घणाघात|VIDEO

झाडं छाटायच्या आधी भाजपने पक्षातले कार्यकर्ते छाटले; राज ठाकरे नाशिकमधून गरजले

SCROLL FOR NEXT