Maha Kumbh Mela Fire Saam Tv
Video

Maha Kumbh Mela Fire: प्रयागराजच्या महाकुंभमेळाव्यात भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५० गाड्या घटनास्थळी; पाहा VIDEO

Maha Kumbh Mela 2025: प्रयागराज महाकुंभच्या सेक्टर -१९ मध्ये शास्त्री पूल आणि रेल्वे पूलच्या खाली असलेल्या तंबूंना ही आग लागली. आग इतकी भीषण आहे की ती वाढत चालली आहे.

Priya More

प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. महाकुंभ मेळ्यामध्ये भीषण आग लागली. कुंभ मेळ्यामध्ये असलेल्या तंबूंना भीषण आग लागली आहे. आगीमध्ये अनेक तंबू, साहित्य जळून खाक झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज महाकुंभच्या सेक्टर -१९ मध्ये शास्त्री पूल आणि रेल्वे पूलच्या खाली असलेल्या तंबूंना ही आग लागली. महाकुंभ मेळ्याच्या ठिकाणी असलेल्या लोखंडाच्या पूलाच्या खाली असलेल्या तंबूंना ही आग लागली आहे. आग लागल्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आहे. परिसरामध्ये भाविकांची पळापळ झाली आहे. परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत. पूलाच्या खाली आग लागल्यामुळे पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. ही आग वेगाने वाढत चालली आहे. आगीमध्ये अनेक सिलिंडरचा स्फोट झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: आमदार-खासदारांना मोठा धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नो एन्ट्री

PF Withdrawal : PF खात्यात 1 लाख रुपये जमा असतील तर किती पैसे काढता येतात? जाणून घ्या नवे नियम

Maharashtra News Live Update: वाशिममध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक; भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू, दोन उर्दू शिक्षकांचाही समावेश

'कोठडीत तरुणांना इतकं मारलं की एका कानाने ऐकू येईनासं झालं! राहुल गांधींचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

Nalasopara : नालासोपाऱ्यात धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मुलीची प्रसूती, दुसऱ्या दिवशी ४० हजारांना विकले बाळ

SCROLL FOR NEXT