Mumbai Real Estate Shocker Worli Apartment Leased at Rs 18.03 Crore saam tv
Video

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

mumbai worli flat rented for rs 18 crore over five years : सर्वसामान्यांसाठी फ्लॅटचं भाडं जेमतेम १०-१५ हजार रुपये महिना. ते भाडं भरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. पण मुबईतील एका फ्लॅटसाठी तब्बल १८.०३ कोटी रुपयांचा भाडेकरार करण्यात आलाय. ५ वर्षांसाठी हा भाडेकरार झालाय.

Saam Tv

मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या असतानाच एका फ्लॅटसाठी कोट्यवधींचा भाडेकरार झालाय. मुंबईतील वरळीत एका फ्लॅटसाठी तब्बल १८ कोटी रुपयांचा भाडेकरार करण्यात आला आहे. वरळीतील थ्री सिक्स्टी वेस्ट इमारतीतील या फ्लॅटचं महिन्याचं भाडं २७ ते ३३ लाख रुपये इतकं असून, पाच वर्षांसाठी १८.०३ कोटी रुपयांचा भाडेकरार करण्यात आला आहे. कोल्हापूरमधील एसजीजी व्हेंचर्स एलएलपीने वरळीतील 'थ्री सिक्स्टी वेस्ट'च्या टॉवर बीमधील २२ व्या मजल्यावरचा ६८३१ चौरस फुटांचा आलिशान फ्लॅट भाड्याने घेतला आहे. या करारासाठी १.६५ कोटी रुपयांची सुरक्षा ठेव भरण्यात आली असून, ४.७३ लाख रुपयांचं मुद्रांक शुल्क भरण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडच्या देवकुंड धबधब्यात दुर्दैवी दुर्घटना, रेस्क्यू पथकाला मृतदेह शोधण्यात यश

Kitchen Cockroach Problem: किचनमधील झुरळांचा त्रास संपला! रात्री ओट्याजवळ ठेवा 'हा' १ पदार्थ; सकाळी एकही झुरळ दिसणार नाही

गावरान स्टाईल अळंबी रानभाजी तुम्ही कधी खाल्लीये का? सोपी आहे रेसिपी

रेल्वे स्थानकावर हायव्होल्टेज ड्रामा! प्रेयसीची मनधरणी करण्यासाठी तरुणाने घातले थेट लोटांगण, व्हिडिओ व्हायरल

Kids Healthy Breakfast : फक्त ५ मिनिटांत तयार करा मुलांसाठी हेल्दी नाश्ता

SCROLL FOR NEXT