Eiffel Tower Saam Tv
Video

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

Eiffel Tower Viral Video: पॅरिसमधील आयफेल टॉवरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विजांच्या कडकडाटामध्ये आयफेल टॉवरचे सौंदर्य खुलून निघाले.

Priya More

पॅरिसमधील आयफेल टॉवरवर वीज कोसळल्याचा एक थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यादरम्यान आयफेल टॉवरच्या सर्वोच्च टोकावर अत्यंत तीव्र क्षमतेची वीज कोसळली. या विजेच्या जोरदार प्रहाराने संपूर्ण टॉवर एका क्षणासाठी प्रकाशाने उजळून निघाला होता. निसर्गाच्या या रौद्ररूपाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे यात आयफेल टॉवरचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. आयफेल टॉवरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून युरोपमधील नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले होते. पण अचानक याठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झाली त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. याठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. या पावसादरम्यान झालेल्या विजांच्या कडकडाटादरम्यान आयफेल टॉवरचं सौदर्य आणखीनच खुलून दिसलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT