धीरज सेठ हे भारताचे नवे लष्करप्रमुख असतील.  saam tv
Video

Dheeraj Seth : धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Who is New Army Chief Dheeraj Seth : भारतीय सैन्याच्या नेतृत्वात मोठा बदल झाला आहे. धीरज सेठ यांची नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे संरक्षण क्षेत्रात नव्या धोरणांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Saam Tv

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे भारताचे नवे लष्करप्रमुख असतील. सरकारनं शनिवारी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. धीरज सेठ हे सध्या लष्कराचे उपप्रमुख या पदावर कार्यरत आहेत. यासंबंधी संरक्षण मंत्रालयानं सोशल मीडिया एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. उपेंद्र द्विवेदी हे निवृत्त झाल्यानंतर ३० जून २०२६ पासून सेठ हे पदभार स्वीकारतील.

भारतीय लष्कराचे विद्यमान प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे ३० जून २०२६ रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे पदभार स्वीकारतील. नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे माजी विद्यार्थी आणि बख्तरबंद कोरचे अधिकारी धीरज सेठ यांना जवळपास चार दशकांचा विशिष्ट सेवांचा अनुभव आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ऑपरेशनल, कमांड आणि धोरणात्मक पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. लेफ्टनंट जनरल म्हणून भारतीय लष्करातील अत्यंत महत्वाचे सुदर्शन चक्र कोरचे नेतृत्व केले आहे.

संरक्षण मंत्रालयानुसार, सेठ यांनी लष्कराचे कमांडर म्हणून साऊथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांड अशा दोन्ही विभागांचे नेतृत्व केले आहे. सेठ हे दोन्ही ऑपरेशनल कमांडचे नेतृत्व करणाऱ्या निवडक अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर,कार, दुचाकीची एकमेकांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Sunday Horoscope : व्यवसायात लाभ होणार; ५ राशींच्या व्यक्तींना धनलाभ होणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Acidity : ॲसिडीटीमुळे जुलाब होतायेत? स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ ठरेल वरदान, पोटातील गडबड झटक्यात होईल गायब

Sejal Pawar: प्रणित मोरेच्या शोमध्ये नको ते बरळणाऱ्या सेजल पवार आधी FIR दाखल, आता KEM कॉलेजकडून मोठी कारवाई

Maharashtra News Live Update : बालगंधर्वमधील शोकसभेमुळे नागरिक संतप्त; नाटकाला उशिर होत नाट्य प्रेमी संतापले

SCROLL FOR NEXT