Asha Bhosle funeral details  Saam TV
Video

Asha Bhosle Funeral: एका युगाचा अंत! आशा भोसलेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

Asha Bhosle death : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली असून चाहत्यांकडून अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Asha Bhosle funeral details Mumbai time and venue : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याचं पार्थिव सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रविवारी त्यांचं ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं होतं...वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल ६ दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय...त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली.

आशाताईंचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संगीत क्षेत्र, चित्रपटसृष्टी, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो चाहते 'आशाताईं'ना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून शिवाजी पार्क परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT