Laxman Hake addressing the media during his criticism on OBC reservation issue Saam Tv
Video

Laxman Hake: कुवत किती, लायकी किती? लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल|VIDEO

OBC Reservation Row Heats Up: लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे आणि सरकारवर जोरदार टीका केली. जीआर चुकीचा असल्याचा आरोप करत त्यांनी संघर्षयात्रेची घोषणा केली.

Omkar Sonawane

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असतानाच लक्ष्मण हाके यांनी सरकारवर आणि मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बैठकीसाठी बोलावलं असलं तरी राज्यातील विविध ठिकाणी सभा असल्याने उपस्थित राहता आलं नाही, असं हाके यांनी सांगितलं. ओबीसी समाजाच्या बाजूने कोणी येत असेल, त्यांच्यासोबत हाके उभा राहणार, असं त्यांनी स्पष्ट केलं. बारामती, लातूर, गेवराई याठिकाणी ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात बाहेर येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्रभर संघर्ष यात्रा काढली जाणार असल्याची घोषणा केली. सरकारला जीआर काढण्याचा अधिकार नाही. एससी-एसटी समाजाला बंजारा समाजाने केलेली मागणी न्यायिक बाब आहे. सरकारने काढलेला जीआर चुकीचा आहे. उपसमितीला असा अधिकार नाही, असं हाके म्हणाले.

मनोज जरांगेवर टीका

९४ जीआर असा तसा लागू झालेला नाही, त्यावर नऊ न्यायाधीशांचं बेंच होतं. मंडल आयोग लागू झाला. जरांगे यांना मंडल आयोगाची माहितीच नाही. त्यांचा हेतू ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा आहे, असा आरोप हाके यांनी केला. देशात असं काही झालं तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, पंतप्रधानांनाही विचार करावा लागेल. मग तेव्हा तुम्ही ‘किस झाड की पत्ता’, असं ते म्हणाले.

अमरसिंह पंडितांवर सोडले टीकास्त्र

ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी आता ते बोलतायत. आत्तापर्यंत का नाही बोलले? मतदान घेताना असं काही बोलले का? आरक्षणाचा लढा पाडण्यासाठीच हे सगळं आहे, असा प्रश्न हाके यांनी उपस्थित केला. वल्गना करण्यापेक्षा आधी आरक्षण जाहीर करा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

रोहित पवारांवर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, भाजपने मला सांगितलं की लोकांच्या अधिकारावर बोलायचं नाही का? मग रोहित पवारांचं गोंधळ काय आहे, हे त्यांनाच माहीत आहे, असं हाके यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : सतत तहान, थकवा अन् अचानक वजन कमी होतेय? ही लक्षणे चुकूनही दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध! सांगलीत मोजणी बंद पाडली

EPFO New Update : EPFO चा मोठा धमाका! PF चे पैसे काढण्यासाठी मिळणार 3 पर्याय

बाहेरचा शोरमा खाताय? सावधान! भिवंडीत शोरमा खाल्ल्याने 42 जण रुग्णालयात, लहान मुलांसह गरोदर महिलेचीही प्रकृती बिघडली

Steel Tap Cleaning : बाथरूममधील स्टीलच्या नळावर पांढरे डाग पडलंय? 'या' घरगुती ट्रिकने करा चकाचक

SCROLL FOR NEXT