Laxman Hake Drunk Video Saam TV
Video

Laxman Hake Video : लक्ष्मण हाके दारूच्या नशेत टुल्ल? चालताही येईना, नवा VIDEO आला समोर

Laxman Hake Drunk Video : या व्हिडीओमध्ये लक्ष्मण हाके मराठा आंदोलकांच्या गर्दीत गोंधळलेल्या अवस्थेत चालत असल्याचं दिसून येत आहे.

Satish Daud

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध करणारे लक्ष्मण हाके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मराठा आंदोलकांनी हाकेंना घेराव घातल्याचं दिसून येत आहे. हाके दारूच्या नशेत टुल्ल असून त्यांना धड चालताही येत नाही, असा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे.

पुण्यातील कोंढावा परिसरात हा राडा झाल्याचं कळतंय. या व्हिडीओमध्ये मराठा आंदोलकांच्या गर्दीत लक्ष्मण हाके गोंधळलेल्या अवस्थेत चालत असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे हाके यांनी मात्र आपण मद्यपान केलं नसल्याचं म्हटलं आहे. माझी वैदयकीय तपासणी करावी असं म्हणताना हाकेंनी आपण कुठेही पळून गेलेलो नाही असंही म्हटलं आहे.

हाके यांनी मराठा आंदोलकांचे आरोप फेटाळून लावत, "उलट माझ्याच जीवाला धोका आहे," असा आरोप केला आहे. दुसरीकडे दारूच्या नशेत हाकेंनी धिंगाणा घातल आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूंची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT