बनावट खत विक्री प्रकरणी 11 जून रोजी साम टीव्ही ने सर्वप्रथम बातमी दाखवली होती. बातमी लागताच कृषी विभागाने केली कारवाई करण्यात आली आहे, दरवर्षी राज्यात खरिप पेरणीच्या तोंडावर बाजारात बोगस खत बी बियाणे विक्री करण्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे होत असतात, यात कृषी विभागाच्या पथकाकडून कारवाई देखील केल्याच्या अनेक बातम्या समोर येतात, मात्र लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील किनगाव आणि चाकूर इथे दोन कृषी सेवा केंद्रावर लातूरच्या कृषी विभागाने छापेमारी केली. यादरम्यान जवळपास 260 बनावट डीएपी खताचा साठा जप्त केला आहे, या दोन्ही कृषी सेवा केंद्र चालकांवर बनावट बियाणे अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप दोन्ही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार आहेत, त्यामुळे सातत्याने शेतकऱ्यांच्या नशिबी बोगस खत बियाणे मारणाऱ्या अशा कृषी सेवा केंद्र चालकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते सत्तार पटेल यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.