latur news.jpg 
Video

Latur OBC News : मराठा आरक्षणासाठी GR, ओबीसी तरूणाने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीत काय लिहिले?

OBC reservation, Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या जीआरमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याची भावना झाल्याने वांगदरी येथील भरत कराड या तरुणाने आत्महत्या केली.

Namdeo Kumbhar

Latur OBC youth suicide over Maratha reservation GR : लातूरमध्ये ओबीसी समाजातील तरुणाने मांजरा नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लातूरच्या रेनापुर तालुक्यातील वांगदरी इथल्या भरत महादेव कराड असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्याने ओबीसी आरक्षण कायमस्वरूपी संपवल आहे, ओबीसी विरुद्ध जीआर काढला. असा उल्लेख त्याने चिठ्ठीत केला आहे... मांजरा नदी पात्रा उडी घेत आत्महत्या केली आहे...

मंत्री छगन भुजबळ आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, ओबीसी समाजातील आत्महत्या केलेल्या भरत कराड याच्या कुटुंबीयांची घेणार सांत्वन पर भेट घेणार आहेत. लातूरच्या वांगदरी येथे ते ओबीसी समाजातील तरुणाने आत्महत्या केली आहे., दरम्यान या आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांची भेट मंत्री छगन भुजबळ घेणार आहेत. लातूरच्या रेनापुर तालुक्यातील वांगदरी येथील भरत कराड या 34 वर्षीय युवकाने ओबीसी आरक्षणाला धक्का लागला ,सरकारने ओबीसीने आरक्षणाचा जीआर काढला, आणि हैदराबाद गॅजेट लागू केले त्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आलं,अशी चिट्टी लिहून मांजरा नदी पात्रात उडी घेत ,आत्महत्या केली होती. तर या कुटुंबीयांची सांत्वन्पर भेट छगन भुजबळ आणि ओबीसीतील काही नेते घेणार आहेत..

लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील भरत महादेव कराड या ३५ वर्षीय तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या नैराश्यातून मांजरा नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना मन सुन्न करणारी आहे. त्यास भावपूर्ण श्रद्धांजली! या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवार दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी लातूर येथे या आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी जात आहे. सध्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात घडणाऱ्या घडामोडी सर्वसामान्य ओबीसीला अस्वस्थ करणाऱ्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण संविधान आणि कायद्यामुळे नक्की न्याय मिळेल,त्यासाठी लढावं लागणार आहे. त्याला आपण खंबीर आहोत. त्यामुळे कृपया कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये, असे महाराष्ट्रातील समस्त ओबीसी बांधवांना माझे कळकळीचे आवाहन आहे.
छगन भुजबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT