Latur Flood Video Saam Tv
Video

Latur Flood: पुराचं पाणी शेतात घुसलं, उभं पिक डोळ्यांसमोर आडवं झालं; शेतकऱ्याने फोडला टाहो, मन हेलावून टाकणारा VIDEO

Latur Flood Video: लातूरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टरवरील पिक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. अशाच एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा मोठा फटका जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना बसला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतीमध्ये पूराचे पाणी शिरले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शेतामध्ये पूराचे पाणी साचल्यामुळे शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. शेतातील उभी पिकं आडवी झाली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील ब्रम्हवाडी शिवारात पाणी शिरल्याचं पाहून एका वृद्ध शेतकऱ्याने आक्रोश केला. हा शेतकरी धावत जाऊन पाण्यात जीव देण्यासाठी निघाला होता. त्याला काही शेतकऱ्यांनी अडवले.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यामध्ये पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाली आहे. चाकूर तालुक्यातल्या वडवळ नागनाथ गावात नुकताच सुरू असलेल्या महामार्गावर पूराचे पाणी आले. पूराचे पाणी नागरिकांच्या घरात गेल्याने नागरिकांचे मोठं नुकसान झाले आहे. संसार उपयोगी वस्तू पूराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्यामुळे नागरीक संकटात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT