Nalasopara SAAM TV
Video

Nalasopara : नालासोपाऱ्यात शॉर्टसर्किटमुळे इमारतीला आग | VIDEO

Short Circuit : नालासोपारा पूर्वेकडील नऊ मजली लंबोदर अपार्टमेंटला आग लागल्याने खळबळ उडाली.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पूर्वेकडील नऊ मजली लंबोदर अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीने परिसरात खळबळ उडाली आहे. आगीमुळे सर्वत्र काळाकुट्ट धुर पसरला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने आग लागली तेव्हा घरात कुणीही नव्हतं त्यामुळे जीवितहानी टळली मात्र या आगीत घराचे मोठं नुकसान झाले आहे. प्राथमिक तपासानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीनंतर अपार्टमेंट परिसरात सुरक्षितेसाठी खबरदारीचे उपाय सुरु करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT