Lalbaugcha Raja lakhs of rupees donated on 1st day Saam Tv
Video

Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाला डॉलरचा हार, पहिल्याच दिवशी लाखो रुपयांचे दान; पाहा VIDEO

Lalbaugcha Raja lakhs of rupees donated on 1st day: लालबागच्या राजाला पहिल्या दिवशी लाखो रुपयांचे दान करण्यात आले आहे. दानपेटी उघडून पैशांची मोजणी सुरू करण्यात आली आहे.

Priya More

मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी लालबागच्या राजाच्या पैशांसह सोनं-चांदी दान केली. आज लालबागच्या राजाच्या दानपेटीतील देणगीची मोजणी करण्यात आली. पहिल्या दिवशी भाविकांनी लाखो रुपये बाप्पाला दान केले. दान पेटीमध्ये नोटांच्या हारसोबत डॉलरचा हा देखील निघाला. हा डॉलरचा हार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

मागच्यावर्षी लालबागच्या राजाला भाविकांनी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी ५८ लाखांचे दान करण्यात आले होते. यावर्षी देखील पहिल्या दिवशी इतकीच रक्कम दान करण्यात आली असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. पहिल्या दिवसाची दान पेटी उघडून त्यामधील रक्कम बाहेर काढण्यात आली. बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी या नोटांची मोजणी करत आहेत. १०, ५०, १००, ५०० रुपयांच्या नोटांसह डॉलरचे हार दानपेटीमध्ये टाकण्या आले होते. फक्त पैसेच नाही तर सोनं-चांदीसह अनेक मौल्यवान वस्तू लालबागच्या राजाला दान केले जातात. लालबागचा राजा हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. काही जणांचा नवस असतो. तो पूर्ण झाल्यानंतर अनेक भाविक लालबागच्या राजाला शक्य असेल त्या मौल्यवान वस्तू किंवा पैशांचे दान करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kartik Maas 2025: आजपासून कार्तिक महिना सुरु, घरात ही ५ महत्वाची कामे करा धन-समृद्धी अन् शांती यईल

Pratap Sarnaik: जिथं मीरा-भाईंदरमध्ये मराठीसाठी राज ठाकरेंनी सभा घेतली होती, तिथंच प्रताप सरनाईक म्हणाले 'मी हिंदीतच बोलतो अन् आयुक्तांना ... VIDEO

Maharashtra Live News Update : ४५ लाख शेतकऱ्यांना विमा उतरवला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांचा या ५ गोष्टी करा आत्मसात, १६-३० वयात पैशांची चणचण जाणवणारच नाही

Accident News : मुंबईत अपघाताचा थरार, टेम्पोची बससह अनेक वाहनांना धडक; ७ जणांना उडवले

SCROLL FOR NEXT